image
images Sep 12, 2023

Grape Cultivation Under Plastic Cover

Grape Cultivation Under Plastic Cover

In India, Thomson Seedless, Sonaka, and their related varieties account for more than 80% of the total grape-growing area. However, unseasonal rainfall, dew, fog, and low temperatures frequently cause berry cracking, leading to significant losses during harvest.

To reduce weather-related losses, many growers are now adopting plastic-covered vineyards. The Government of Maharashtra has also introduced a subsidy scheme under which eligible farmers can receive up to 50% financial assistance.

Benefits of Plastic Cover

1. Protection Against Berry Cracking

Protects grape bunches from rain, dew, fog, and cold weather, significantly reducing cracking.

2. Reduced Disease and Pest Pressure

A controlled environment helps improve fruit quality and reduces crop losses.

3. Early Harvest and Better Market Prices

Early maturity allows growers to enter the market sooner and secure premium prices.


Challenges Under Plastic Cover

1. Increased Vine Vigour

Higher CO₂ concentration and competition for sunlight can result in excessive vegetative growth and dense canopies.

2. Increased Powdery Mildew Risk

The warm and dry microclimate under plastic cover favors the development of Powdery Mildew.

3. Flower Drop and Poor Fruit Set

Excessive vigour and dense canopy growth may divert nutrients away from flower clusters, affecting fruit set.

4. Leaf Scorching and Spray Sensitivity

Tender leaves grown under plastic cover require careful spray management, including proper water pH and spray concentrations.


Maximize Your Success with Grape Master

Plastic-covered grape cultivation offers tremendous opportunities, but success depends on proper vineyard management.

The Grape Master App provides scientifically designed schedules and recommendations specifically for plastic-covered vineyards.

Register your vineyard today and maximize your yield, fruit quality, and profitability with Grape Master.

प्लॅस्टिक कव्हर खाली द्राक्ष शेती

प्लॅस्टिक कव्हरखालील द्राक्ष शेती

भारतात द्राक्ष शेती प्रामुख्याने खुल्या वातावरणात केली जाते. थॉमसन सीडलेस, सोनाका आणि त्यांच्यापासून विकसित झालेल्या विविध जातींचे क्षेत्र एकूण द्राक्ष लागवडीपैकी 80 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

मात्र, अवेळी पाऊस, थंडी, दव आणि धुके यांसारख्या हवामानातील बदलांमुळे द्राक्षांमध्ये क्रॅकिंगची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी काढणीच्या काळात सुमारे 70 ते 80 टक्के बागा अडचणीत येतात. यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षभराचे श्रम, खर्च आणि वेळ वाया जाण्याची शक्यता निर्माण होते.

या समस्येवर उपाय म्हणून अलीकडच्या काळात प्लॅस्टिक कव्हरखाली द्राक्ष शेती करण्याकडे बागायतदारांचा कल वाढत आहे. महाराष्ट्र शासनाने देखील द्राक्ष बागांसाठी प्लॅस्टिक कव्हर उभारणीसाठी अनुदान योजना सुरू केली असून पात्र शेतकऱ्यांना 50 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकते.

द्राक्ष शेतीमध्ये प्लॅस्टिक कव्हरचे फायदे

1. क्रॅकिंगपासून संरक्षण

पाऊस, दव, धुके आणि थंडीचा थेट परिणाम घडांवर होत नसल्यामुळे द्राक्ष क्रॅकिंगची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होते.

2. रोग व किडींचा कमी प्रादुर्भाव

नियंत्रित वातावरणामुळे अनेक रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता सुधारते आणि संरक्षण खर्चातही बचत होऊ शकते.

3. अर्ली सीझन उत्पादन व अधिक बाजारभाव

प्लॅस्टिक कव्हरखालील बागांमध्ये उत्पादन लवकर तयार होते. त्यामुळे सीझनपूर्वी बाजारात माल उपलब्ध करून अधिक दर मिळवण्याची संधी निर्माण होते.

या सर्व फायद्यांमुळे उत्पादनाची शाश्वती वाढते आणि अधिक नफा मिळण्याची शक्यता निर्माण होते.


प्लॅस्टिक कव्हरखालील द्राक्ष शेतीतील आव्हाने

ओपन प्लॉटमधील व्यवस्थापनापेक्षा प्लॅस्टिक कव्हरखालील द्राक्ष शेतीचे तंत्र वेगळे आहे. त्यामुळे या पद्धतीचा अभ्यास करून योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

1. वेलीचा जोम वाढणे

प्लॅस्टिक कव्हरखाली कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण तुलनेने अधिक राहते. तसेच कॅनोपीमध्ये प्रकाशासाठी स्पर्धा निर्माण होते. त्यामुळे वेल अधिक जोमाने वाढते आणि कॅनोपीची गर्दी वाढते. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी कोंब व फांद्या कव्हरच्या दिशेने वेगाने वाढतात.

2. भुरी रोगाचा वाढता प्रादुर्भाव

प्लॅस्टिक कव्हरखाली पाऊस किंवा दव पडत नसले तरी तेथील कोरडे आणि उबदार वातावरण भुरी (Powdery Mildew) रोगाच्या वाढीस अत्यंत अनुकूल असते. त्यामुळे नियमित निरीक्षण व योग्य रोग व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते.

3. फुलोऱ्यात गळकुज समस्या

वेलीचा वाढलेला जोम, कॅनोपीची गर्दी आणि शेंड्याकडील वाढलेली अपिकल डॉमिनन्स (Apical Dominance) यामुळे वनस्पतीची ऊर्जा मुख्यतः वाढीकडे खर्च होते. त्यामुळे मोहर, फुलोरा आणि घडांच्या विकासाकडे तुलनेने कमी लक्ष जाते. परिणामी फुलोऱ्यात गळकुज वाढण्याची शक्यता निर्माण होते.

याशिवाय, प्लॅस्टिक कव्हरखाली वाढीच्या अवस्था (Stages) ओपन प्लॉटपेक्षा साधारण 5 ते 10 दिवस लवकर येतात. त्यामुळे वेलीतील राखीव अन्नसाठ्याचा वापर वाढीकडे अधिक होतो आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत गळकुजाची समस्या वाढू शकते. त्यामुळे या टप्प्यावर योग्य व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते.

4. पानांवर स्क्रॅचिंगची समस्या

प्लॅस्टिक कव्हरखाली वाढलेली पाने तुलनेने अधिक नाजूक असतात. त्यामुळे फवारणी करताना पाण्याचा pH, औषधांचे प्रमाण आणि फवारणीची तीव्रता यांचा विशेष विचार करावा लागतो. अन्यथा पानांवर स्क्रॅचिंग, करपणे किंवा फाइटोटॉक्सिसिटीची समस्या उद्भवू शकते.


योग्य व्यवस्थापनानेच मिळेल अधिक नफा

प्लॅस्टिक कव्हरखालील द्राक्ष शेती ही हवामानातील अनिश्चिततेवर मात करण्यासाठी प्रभावी पर्याय ठरत आहे. मात्र या तंत्रज्ञानाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी त्यामागील शास्त्र समजून घेणे आणि त्यानुसार व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

ग्रेप मास्टर ॲपमध्ये प्लॅस्टिक कव्हरखालील द्राक्ष बागांसाठी विशेष शास्त्रीय शेड्यूल तयार करण्यात आले आहे. आपल्या प्लॉटची नोंदणी करून नियोजनबद्ध व्यवस्थापन करा आणि अर्ली सीझनमध्ये दर्जेदार उत्पादनासह अधिक नफा मिळवा.

आजच ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड करा आणि आपल्या द्राक्ष बागेचे स्मार्ट व्यवस्थापन सुरू करा!


payment success

Your order has been successfully processed! Please direct any questions you have to the store owner. Thanks for shopping

continue browsing

your order is being processed

We Have Just Sent You An Email With Complete Information About Your Booking